ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६०० कुटुंबे राहतात. एकूण ३०२९ लोकसंख्येपैकी १५१७ पुरुष तर १५१२ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
३०२९
पुरुष लोकसंख्या
१५१७
महिला लोकसंख्या
१५१२
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
४०८
अनुसूचित जाती (SC %)
०.६%
अनुसूचित जमाती (ST %)
७८.७ %

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

11

होय
प्राथमिक शाळाहोय8होय
माध्यमिक शाळाहोय2होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे

बँकेचे नाव : महाराष्ट्र ग्रामीण बँक आलोंडे 

शाखेचे नाव:आलोंडे 

अकाउंट नंबर : 55605013142

आई एफ एस सी कोड :MAHG0005605

पत्ता : ग्रामपंचायत आलोंडे
ता. – विक्रमगड, जि. – पालघर ( ४२१३०३ )