ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात आलोंडे हे एक प्रमुख ग्रामीण आणि आदिवासी बहुसंख्य गाव वसवलेले आहे. हे गाव विक्रमगडपासून अवघ्या काही अंतरावर असून, परिसरातील वाड्या-वस्त्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथील ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक प्रशासकीय कारभार चालवला जातो. येथील लोकांची मुख्य भाषा मराठी असून, येथील जीवन प्रामुख्याने शेती आणि स्थानिक व्यवसायांवर अवलंबून आहे.
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६०० कुटुंबे राहतात. एकूण 4123 लोकसंख्येपैकी 2066 पुरुष तर 2067 महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
आलोंडे गावात शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षणासाठी गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण देणारे एस.बी.जी.एस.व्ही. आलोंडे (S.B.G.S.V. Alonde) ही शाळा व जुनिअर कॉलेज कार्यरत आहे. आरोग्याच्या दृष्टीने गावात शासकीय उपकेंद्र (Sub Centre) असून, प्राथमिक उपचारांची सोय होते. दळणवळणासाठी हे गाव पक्क्या रस्त्यांनी जोडले गेले असून, बस व खाजगी वाहनांद्वारे विक्रमगड आणि लगतच्या परिसराशी सहज संपर्क साधता येतो. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय प्रामुख्याने शेती, शेतमजुरी आणि स्थानिक उपजीविकेच्या साधनांवर आधारित आहे.

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री

श्रीम. सुमेत्रा अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री. राजेंद्र पाटील
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

श्री. महेश मधुकर पांढरे
गट विकास अधिकारी
पंचायत समिती विक्रमगड

श्री. प्रमोद पांडुरंग पाटील
प्रभारी सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे

श्रीम. साधना संतोष दाताले
सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे

श्री. प्रमोद पांडुरंग पाटील
उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे

श्री. विजय वि. बिल्लेवार
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे
चालू योजना







